Vector

आमच्या विषयी

सेवा बहुद्देशीय संस्था, अकोला या समाज प्रेमी संस्थेची नोंदणी २०१२ साली झाली होती. "समाजासाठी आपणही काहीतरी देणे लागतो" या विचारातून संस्थेची मूळ प्रेरणा उदयास आली. संस्थेचे संस्थापक वैभव दिलीपराव वानखडे यांनी कॉलेज जीवनापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, ज्यातून संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी केला होता.

संस्थेचा प्रवास अनेक अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनातून पुढे जात आहे. सामाजिक कार्य काय असावे? यापेक्षा सामाजिक कार्य कसे करावे यावर आधारित धोरणे आखली आहेत.

पर्यावरण आपल्यासाठी आहे तसेच आपणही पर्यावरणासाठी आहोत असा आस्थेचा दृष्टीकोन प्रत्येक मोहिमेत आखला जातो. अतिदुर्गम भागात जाऊन काम करण्याची सत्वशिलता नेहमीच जपली जाते.

सेवेचा परिवार, सेवेचे वाटेकरी आणि सेवेचे धारकरी असा स्थिरावलेला आहे. विविध क्षेत्रातील नवनवीन लोक संस्थेच्या कार्यामध्ये मनापासून जोडले जातात. सर्वाना सोबत घेऊन समाजाविषयी प्रेमभावना वाढवणे, मिळेल तसा वेळ समाजोपयोगी आणणे, मानव आणि निसर्गाचा दुवा म्हणून काम करणे असे अनेक प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून सेवा संस्था काम करत आहे.

सेवा बहुद्देशीय संस्था, अकोला निस्वार्थ सेवा फाऊंडेशन

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री वैभव दिलीपराव वानखडे यांनी समाजाचे काही देणे लागते या तत्वावर १९/११/२०१२ ला सेवा बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली.

मुळात समाजातील वंचित घटकातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात कसे आणता येऊ शकते मग ते शिक्षणापासून ते खेळ, आरोग्य, कला उद्योगाकडे मुख्यत्वे लक्ष करून देऊन समाजातील या सर्व वंचितांपर्यंत पोहचण्याचा सोबतच पर्यावरणाविषयी असलेली आपली आत्मीयता जपण्याचा मानस अध्यक्षांनी ठेवला.

त्या तत्वानुसार वाटचाल करीत पर्यावरणाच्या विविध ज्वलंत विषयांवर काम करणे सुरु केले आणि त्याच सोबत शिक्षण क्षेत्र, क्रीडा, आरोग्य यामध्ये आजची गरज लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील मेळघाट स्थित आदिवासी बहुल भागात काम सुरु केले आहे.

वैभव दिलीपराव वानखडे
CSR Initiatives

मागील ८ वर्षाचा आढावा

२०१२-२०१३-२०१४ : सुरुवातीच्या काळात पर्यावरण हे संस्थेचे प्रमुख उद्देशात समाविष्ट होते. पहिल्या ३ वर्षात संस्थेने आपल्या प्रमुख उद्दिष्टांवर काम केले. बीज संकलन कसे करावे या पासून सुरु केलेला प्रवास हा प्रत्येक मोहिमेमध्ये अभ्यास करूनच मार्गक्रमण केला गेला आहे. वृक्षारोपण जनजागृती, प्रत्येक शासकीय प्रांगणात वृक्षारोपण, वृक्षसंगोपन मोहीम असे अनेक उपक्रम राबविले.

२०१५-२०१६-२०१७ : पुढील काळात संस्थेने आपल्या उद्दिष्टांमध्ये वाढ करत इतर महत्वाच्या उपक्रमात पुढाकार घेतला. गणेशोत्सवात इको फ्रेंडली गणेशा, विसर्जनामध्ये ध्वनी प्रदूषणांस विराम, वाढदिवस साजरा करण्याचा दृष्टीकोन बदलून वायफळ खर्च करू न देता अनाथ आश्रमात खाऊ वाटप, चॉकलेट वाटप असे उपक्रम सुरु केले. आश्रमांना भेटी देऊन भेटीगाठींचे कार्यक्रम, हसतमय, आनंदमय वातावरण तयार करून आश्रमातील सामाजिक अस्तित्वाची जाणीव असलेले कार्यक्रम राबविले.

२०१८-२०१९-२०२० : या काळात अकोला जिल्हासोबतच इतर शहरात होणाऱ्या गरजू लोकांना मदतकार्य करण्याचा मानस घेतला. सांगली-कोल्हापूर महापूर देणगी मदत, शेतकरी वारकरी लोकांना अन्नदान, कोरोना काळात अन्नधान्य तसेच वैद्यकीय सेवा पुरवल्या. अनेक संस्थाना एकत्र घेऊन संयुक्त विद्यमाने देखील विविध मोहीम राबविल्या. यामध्ये समाजोपयोगी मॅनेजमेंट सप्लाय सिस्टिम म्हणून काम केले.

न्यूज पेपर मीडिया

Vector

फोटो गॅलरी

क्रीडा सेवा

क्रीडा सेवा
क्रीडा सेवा
क्रीडा सेवा

सांस्कृतिक सेवा

सांस्कृतिक सेवा
सांस्कृतिक सेवा
सांस्कृतिक सेवा

पर्यावरण सेवा

पर्यावरण सेवा
पर्यावरण सेवा
पर्यावरण सेवा
पर्यावरण सेवा

आरोग्य सेवा

आरोग्य सेवा
आरोग्य सेवा

शिक्षण सेवा

शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा
शिक्षण सेवा

वाटप सेवा

वाटप सेवा
वाटप सेवा
वाटप सेवा
वाटप सेवा
वाटप सेवा

१५००० मराठी शाळा बंद...
शेवटची घंटा?
शिक्षणाच्या भविष्यासाठी
गंभीर चर्चा

वैभव वानखडे पॉडकास्ट